*⚡कुडाळ ता.०४-:* अत्यंत प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार मिळविलेली सिंधुकन्या हिमानी उत्तम परब हिचा मनसेच्यावतीने सत्कार करण्यात आला. हिमानीच्या कसाल (ता. कुडाळ) येथील घरी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. मनसेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित करण्यात आले. हिमानीला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय मल्लखांब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, मुंबई जिल्ह्याचा सर्वोच्च पुरस्कार व अनेक सुवर्णपदके मिळाली आहेत. मनसेतर्फे तिला पुढील कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, शहर अध्यक्ष सिद्धेश खुटाले, कसाल शाखा अध्यक्ष अनिल कसालकर, सुबोध परब , अमित कुराडे, योगेश्वरी कुराडे उपस्थित होते.
अर्जुन पुरस्कार विजेती हिमानी परबचा मनसेतर्फे सत्कार
