सावंतवाडी ता.०४-:राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हुजुर इमानदार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्याचे सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरिक्षक शफिक खानसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जवादहुसेन खतीब, कार्यअध्यक्ष नजिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, जिल्हा चिटणीस आसिफ ख्वाजा, कणकवली तालुका अध्यक्ष अनवरसाठी, युवती तालुका अध्यक्ष जहीरा ख्वाजा, युवती अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्फिया पटेल, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जावेद शेख व्यापार उद्योग कार्यअध्यक्ष हिदायतुल्हा खान अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत…
