गॅस पाईपलाईन च्या चुकीच्या कामामुळे वेत्ये येथे स्विफ्ट कारला अपघात…

उपसरपंच गुणाजी गावडे आणि ग्रामस्थांनी पाईपलाईन चे काम रोखले…

सावंतवाडी ता.०५-:मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन च्या कामामुळे एका स्विफ्ट कारला अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातात कोणीही जख्मी झाले नसून, स्विफ्ट कारचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी अपघाताची माहिती मिळताच वेत्ये उपसरपंच आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेत अपघात ग्रस्त नागरिकांना मदत केली आहे. यावेळी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले गॅस पाईप लाईन चे काम बंद पाडले आहे. यावेळी गॅस पाईप लाईन साठी मारलेले चर त्यातील माती रस्त्यावर टाकण्यात आली असून, पाईप देखील रस्त्याच्या बाजूला चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली असल्याने उपसरपंच गुणाजी गावडे व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page