*⚡वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला-तुळसमार्गे सावंतवाडीकडे जाणा-या हमरस्त्यास तुळस ते होडावडा दरम्यान पडलेल्या खड्ड्यांची त्वरीत दुरुस्ती न केल्यास आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना लेखी स्वरुपात दिला आहे. या महामार्गावर तुळस ते होडावडा दरम्यान रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. भविष्यात जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी येत्या २० डिसेंबरपर्यंत सदर रस्त्याची डागडुजी करावी. अन्यथा या तारखेनंतर कधीही व कोणत्याही क्षणी रास्ता रोको, अधिका-यांना घेराव किवा संबंधीत कार्यालयावर मोर्चा यापौकी कोणत्याही एका लोकशाही मार्गाचा अवलंब करु, असा इशारा तुळस ग्रामस्थांच्या सहीने लेखी स्वरुपात देण्यात आला आहे. तसेच पादचा-यांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने जैतीर मंदीरनजिकच्या मुख्य थांब्यादरम्यान घालण्यात आलेल्या गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले नसल्याने अपघात घडत असून वाहनचालकांना अतिशय धोक्याचे झाले आहे. त्यामुळे पांढरे मारुन गतिरोधकांची उंचीही कमी करण्याची मागणी केली आहे.
तुळस-होडावडा रस्त्याबाबत ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
