राष्ट्रवादीतर्फे खास सभेचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला हॉस्पिटलनाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस वेंगुर्ला शहर व ग्रामीण मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध फ्रंटमधील पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व कार्यकर्त्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे वेंगुर्ला शहर अध्यक्ष तथा माजी प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page