वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे पदान करण्यात आली . यामध्ये जिल्हा सहसंयोजक-शामसुंदर नारायण लोट (भडगाव) व सुनील तांबे (असलदे), जनसंफ संयोजक-सदानंद पावले (आंब्रड), क्रीडा संयोजक-संजय पवार (डिगस) व स्वाती राऊळ (कुसगाव), शासकीय सुविधा संयोजक- प्रकाश वाघ (तरंदळे), वेंगुर्ला तालुका संयोजक भुषण तुळसकर (तुळस), सहसंयोजक- भरत परब (कुशेवाडा), कणकवली संयोजक- प्रकाश सावंत (तरंदळे), मालवण संयोजक- मुरारी पाटकर (वराड), सहसंयोजक – उदय भोगावकर (कुंभारमाठ), देवगड संयोजक- प्रशांत कदम (आंबेखोल), सहसंयोजक- उज्वला दुसनकर (जामसंडे) यांचा समावेश आहे. नियुक्तीपत्रे प्रदान करतेवेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर, नगरसेवक श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, जिल्हा सदस्य साईप्रसाद नाईक, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील उपस्थित होते.
भाजपाच्या दिव्यांग आघाडीची कार्यकारिणी जाहीर
