Headlines

सावंतवाडी मोती तलावावर ‘आशीर्वादाचा दिवा’…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य: शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम संपन्न..

⚡सावंतवाडी ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमांतर्गत सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथे गुरुवारी सायंकाळी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवेला नमन करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.

‘एक दिवा आशीर्वादाचा, विकसित भारताच्या संकल्पाचा, २५ वर्षांच्या सेवेच्या सन्मानाचा’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सायंकाळी ७ वाजता आपल्या बूथवरील घरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून मोदी यांच्या सेवेला नमन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सावंतवाडी शहरात भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडीवडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मोती तलाव परिसरात दिवा प्रज्वलित करून उपस्थितांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. तसेच मोठ्या संख्येने नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आशीर्वादाच्या दिव्याचे फोटो काढत उपक्रमाला प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page