Headlines

Global Maharashtra Breaking News

शहरातील समस्या सोडवण्यासाठी एकदा शिवसेनेला संधी द्या…

शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांचे आवाहन *⚡वैभववाडी ता.१९-:* मागील पाच वर्षांत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सत्ता आम. नितेश राणे यांच्याकडे दिलीत.या पाच वर्षात नेमका काय विकास झाला हे आपण सर्वानी पाहीलेले आहे.नगरपंचायतीच्या कारभारावर पुर्णपणे नियत्रंण ठेवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.परंतु गेल्या पाच वर्षात जनतेचे मुलभुत प्रश्न मुबलक पाणी,कचऱ्याचा समस्या,रस्ते,हे प्रश्न आमदार मार्गी लावु शकलेले नाहीत.त्यामुळे…

Read More

काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होणारच…

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा सिंधुदुर्ग सह प्रभारी शशांक बावचकर यांनी व्यक्त केला विश्वास… *⚡दोडामार्ग ता.१९-:* सिंधुदुर्गात होणाऱ्या ४ नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्व ठिकाणी स्वबळावर लढा देत असून, काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन पक्षाला तळागाळापर्यंत रुजविण्याचे काम याद्वारे होत आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या…

Read More

आरोस भुताचा सड्यावर आंबा काजू कलमे जळाली

बागायतदारांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान *⚡बांदा ता.१९-:* आरोस भुताचा सडा येथे आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत गजानन (बाबी) जगन्नाथ परब यांचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचे तर अमित नंदाजी नाईक यांचे जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या आगीत आंबा काजू कलमे जळाली आहेत. तर गुरांसाठी साठवून ठेवलेला चाराही जळून खाक झाल्याने शेतकऱ्यावर…

Read More

उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा – नारायण राणे

*⚡वेंगुर्ला ता.१९-:* निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष गिरप यांनी त्यांच्या सहका-यांनी बांधलेल्या या उत्कृष्ट इमारतींची भर पडली आहे. वेंगुर्ला शहरासारखा विकास इतर कुठेच पाहिला नाही. विकास हाच आमचा मुद्दा आहे. आमच्याचंच आम्ही कौतुक करीत नाही तर आम्ही काम आणि कार्याने बोलतो. भविष्यात जिल्ह्यात विविध फॅक्ट-या येणार आहेत. त्यामुळे इथल्या सर्वांनी उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा असे आवाहन…

Read More

कर्नाटकातील त्या घटनेचा सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध…

*⚡सावंतवाडी ता.१९-:* कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून, त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक करून, शुद्धीकरण करण्यात आले आहे. आज सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत…

Read More

गंगा मातेच्या भेटीसाठी किर्लोस देवराठी दाखल

ढोल-ताशांच्या गजरात आगमन; 21 डिसेंबरपर्यंत मुक्काम *⚡कणकवली ता.१९-:* मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथील डेरवण येथे गंगेचा उगम झाला असून गंगा मातेच्या किर्लोस गावची देवराठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी गंगास्थळी दाखल झाली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाली असून किर्लोस गांगोमंदिर येथून 500 मीटर अंतरावर…

Read More

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पोलिस संरक्षण

निकटवर्ती कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी *⚡कणकवली ता.१९-:* जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पोलिसांकडून सतीश सावंत यांना दोन पोलिसांचे पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. येत्या काळात जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातलेली असतानाच सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत यांच्या…

Read More

दलीत वस्तीतील सुधारणांसाठी दलीतवस्ती सुधार योजनेतून निधी द्या…

माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांची निवेदनाद्वारे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी सावंतवाडी-: येथील समाज मंदिर परिसरातील दलीतवस्ती मध्ये सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीच्या दोन चाळी असून, या चाळीत स्वच्छता कर्मचारी तसेच इतर दलीत समाजाची कुटुंबे राहत असून, त्या भागात दलितवस्ती सुधार योजनेतून निधी मंजूर करावा अशी मागणी सावंतवाडीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी…

Read More

गणित संबोध परीक्षेत देसाई मिडियम स्कूलचे यश…

वेंगुर्ला प्रतिनिधी– शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रिं.एम आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल, वेंगुर्ल्याच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे. ५ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेत प्रशालेच्या इयत्ता ५वी, ६वी व ८ वी चे एकूण १२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत…

Read More

लिनेस क्लबची कार्यकारिणी जाहिर

वेंगुर्ला प्रतिनिधी- लायनेस क्लब हा लिनेस क्लबमध्ये परावर्तीत झाल्यानंतर १५ डिसेंबर रोजी लिनेस क्लबची पहिलीच सभा येथील भाटीया हाऊस येथे पार पडली. यावेळी लिनेस डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट अंजू मालू यांनी लिनेसच्या नूतन सभासदांची निवड करुन त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये अध्यक्ष-उर्मिला सावंत, उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सेक्रेटरी शर्मिला मठकर, खजिनदार कविता भाटीया यांचा समावेश आहे. यावेळी हेमा…

Read More
You cannot copy content of this page