लिनेस क्लबची कार्यकारिणी जाहिर

वेंगुर्ला प्रतिनिधी- लायनेस क्लब हा लिनेस क्लबमध्ये परावर्तीत झाल्यानंतर १५ डिसेंबर रोजी लिनेस क्लबची पहिलीच सभा येथील भाटीया हाऊस येथे पार पडली. यावेळी लिनेस डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट अंजू मालू यांनी लिनेसच्या नूतन सभासदांची निवड करुन त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये अध्यक्ष-उर्मिला सावंत, उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सेक्रेटरी शर्मिला मठकर, खजिनदार कविता भाटीया यांचा समावेश आहे. यावेळी हेमा गावस्कर, प्राची मणचेकर, निला यरनाळकर, दिशा कर्पे, बिना भाटीया, स्मिता कोयंडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page