हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करा, कार्यकर्त्यांवर नको…

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे विरोधकांना आव्हान…

*⚡सावंतवाडी ता.१९-:* कणकवलीत काल घडलेला प्रकार चुकीचा असून, हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करा, कार्यकर्त्यांवर हल्ला करू नका. असे आव्हान माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांना केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमधून जिल्हा बँकेवर असणाऱ्या सदस्यांच्या नावावर १३ बोलेरो गाड्या घेण्यात आल्या होत्या. त्यातील केवळ ४ जणांनी आपल्या स्वतःचा खात्यातून ते कर्ज फेडले आहे. परंतु, तरी देखील आम्हा ४ ही जणांच्या गाड्या राणेंच्या ताफ्यात असून, आपण याबाबत तक्रार करणार अशी माहिती समजताच त्यानी टोचन करून आपल्या घरासमोर उभी करण्यात आल्याचे माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा बँकेचे १८ लाख कर्ज थकित असून, येणाऱ्या काळात त्यांच्यावर बोजा चढवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राणे यांना जिल्हा बँकेवर सत्ता हवी असून, त्यांनी सहकार क्षेत्रातील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. परंतु, जिल्हा बँकेवर सत्ता आणण्यासाठी राणे यांच्याकडे मतदार नसल्यानेच ते कणकवली सारखे प्रकार घडवून मतदारांना घाबरवण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

You cannot copy content of this page