सावंतवाडी : मळगाव रस्तावाडी येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंती सण उत्साहात साजरा करण्यात आला. मळगाव परिसरातील भाविकांनी केळी, नारळ ठेवून दत्त माऊलींचे दर्शन घेतले. दत्तजयंतीनिमित्त सकाळी मंदिरात ब्राम्हणाच्या सहाय्याने पूजन, सायंकाळी भजन त्यानंतर मळगाव येथील शेखर पाडगावकर यांचे दत्तजन्मावर आधारित कीर्तन पार पडले.
कीर्तनाला सुनील पाडगावकर यांनी तबलासाथ केली. कीर्तनानंतर दत्तजन्म सोहळा पार पडल्यावर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
