कणकवलीतील प्रकार धक्कादायक…

दहशतवादी प्रवृत्ती पुन्हा वर येतेय त्याला वेळीच संपवा; आमदार दीपक केसरकर यांचे जनतेला आवाहन...

*⚡सावंतवाडी ता.१९-:* कणकवली येथे काल घडलेला प्रकार हा धक्कादायक असून, यापूर्वी देखील असे प्रकार जिल्ह्यात घडले असून, मतदारांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. असा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

जिल्हा बँक आणि दोन दिवसांवर आलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

You cannot copy content of this page