Headlines

बांदा साई मठात १०८ वा साई पुण्यतिथी उत्सव भक्तिभावाने साजरा…

पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पूजा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन..

⚡बांदा ता.२३-: बांदा शहरातील आळवाडा येथील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर यांनी संस्थापित केलेल्या साई मठात १०८ वा साई पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच साईभक्तांनी दर्शनासाठी मठात गर्दी केली होती.
उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता साईंच्या पूजेने, तर ५.३० वाजता काकड आरतीने झाली. त्यानंतर दुपारी ११ वाजता पुरोहित हेमंत धुपकर यांच्या हस्ते साईंची अत्तरपूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता साईंची महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मठात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
(कै.) बाप्पा केसरकर यांनी सुरू केलेल्या या धार्मिक परंपरेचे जतन करत केसरकर कुटुंबीय आणि श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून उत्सवाचे नियोजन करण्यात आले. साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पूजा, आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश उर्फ बाप्पा केसरकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, खजिनदार राजेश कारेकर, सचिव दत्तप्रसाद केसरकर यांच्यासह राजेश केसरकर, प्रितेश केसरकर, शैलेश केसरकर, प्रीतम हरमलकर, साईराज साळगावकर, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, श्रेया केसरकर, प्रिया केसरकर, वर्षा केसरकर, गौरी केसरकर, मीना प्रभू, ज्येष्ठ भजनकर्मी गिरीष महाजन, आशुतोष भांगले, गायत्री भांगले, बंड्या हरमलकर, पुरुषोत्तम पेडणेकर, सतीश नाटेकर, नारायण आकेरकर, श्वेता कोरगावकर, सुनील हरमलकर, राज हरमलकर, ऋषी हरमलकर, ध्रुव केसरकर, शमिका केसरकर, प्रज्वल केसरकर, शर्वी केसरकर, साईशा केसरकर, मंगलदास साळगावकर, प्रभू, गीता हरमलकर आणि बंड्या प्रभू यांच्यासह साईभक्त उपस्थित होते.

You cannot copy content of this page