गणित संबोध परीक्षेत देसाई मिडियम स्कूलचे यश…

वेंगुर्ला प्रतिनिधी– शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रिं.एम आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल, वेंगुर्ल्याच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे. ५ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेत प्रशालेच्या इयत्ता ५वी, ६वी व ८ वी चे एकूण १२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने १०० टक्के यश संपादन केले आहे.

शाळेतील इयत्ता ५वी मधून चिन्मय रघुनाथ कुडपकर, आर्या नरहरी भोसले, गौरांग गोविंद मांजरेकर, शाफिया सलिम शेख सर्व प्राविण्यासह प्रथम श्रेणी, इयत्ता ६ वी मधून नुपूर विलास गावडे, ऋषिक अतुल नेरुरकर प्राविण्यासह प्रथम श्रेणी, प्रिती हर्षल परब (प्रथम श्रेणी) तसेच इयत्ता ८ वीतील निधी सुहास पालकर, चिन्मय नारायण पेडणेकर, केतकी गोपाळ चेंदवणकर, स्वरूपा सचिन आईर, प्रथमेश संजय तेंडोलकर यांनी प्राविण्यासह पथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होत यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना गणित शिक्षिका संजया परब, धनश्री तुळसकर, नीलम नवार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व पालक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page