काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होणारच…

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा सिंधुदुर्ग सह प्रभारी शशांक बावचकर यांनी व्यक्त केला विश्वास…

*⚡दोडामार्ग ता.१९-:* सिंधुदुर्गात होणाऱ्या ४ नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्व ठिकाणी स्वबळावर लढा देत असून, काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन पक्षाला तळागाळापर्यंत रुजविण्याचे काम याद्वारे होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सह प्रभारी शशांक बावचकर यांनीही चारही नगरपंचायत ठिकाणच्या उमेदवारांची व मतदारांची गाठीभेटी घेतल्या असून, काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी निरीक्षक इब्राहीम दलवाई, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, ज्येष्ठ व प्रांतिक सदस्य हिरोजी ऊर्फ दादा परब, जिल्हा उपाध्यक्ष व दोडामार्ग निरीक्षक इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस व वैभववाडी निरीक्षक महेंद्र सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामीया पाटणकर, देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मंचेकर , सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, कणकवली शहर अध्यक्ष महेश, कुडाळ शहर अध्यक्ष सुंदर सावंत, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सुंदरवल्ली पडयाची, मंदार शिरसाट, रवि वासुदेव, संग्राम घुले, सुर्यकांत देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page