आरोस भुताचा सड्यावर आंबा काजू कलमे जळाली

बागायतदारांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान

*⚡बांदा ता.१९-:* आरोस भुताचा सडा येथे आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत गजानन (बाबी) जगन्नाथ परब यांचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचे तर अमित नंदाजी नाईक यांचे जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या आगीत आंबा काजू कलमे जळाली आहेत. तर गुरांसाठी साठवून ठेवलेला चाराही जळून खाक झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

You cannot copy content of this page