शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांचे आवाहन
*⚡वैभववाडी ता.१९-:* मागील पाच वर्षांत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सत्ता आम. नितेश राणे यांच्याकडे दिलीत.या पाच वर्षात नेमका काय विकास झाला हे आपण सर्वानी पाहीलेले आहे.नगरपंचायतीच्या कारभारावर पुर्णपणे नियत्रंण ठेवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.परंतु गेल्या पाच वर्षात जनतेचे मुलभुत प्रश्न मुबलक पाणी,कचऱ्याचा समस्या,रस्ते,हे प्रश्न आमदार मार्गी लावु शकलेले नाहीत.त्यामुळे जनतेने यावेळीची संधी शिवसेनेला द्यावी अस आवाहन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.
लोके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागील पाच वर्षाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.गेल्या पाच वर्षात शहरात विकास कामे झाली नाहीत असा आरोप देखील केला आहे. शहरात स्ट्रीट लाईटच्या कामावर ७८ लाख रूपये खर्च झाले.महाराणा प्रताप कलादालनावर ६० लाख रूपये खर्च झाले.ही कामे कोणी केली.कुणाच्या सांगण्यावरून निवीदा प्रकिया तीन तीनदा राबविण्यात आली.आणि सद्यस्थितीत या दोन्ही कामांची परिस्थिती काय आहे हे वाभवे वैभववाडीतील जनतेने निरखुन पाहीले पाहीजे.निवडणुका येतील आणि जातील परंतु जनतेने वस्तुस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. लोके यांनी म्हटले आहे की, शहरात वडाची झाडे तोडुन सेल्फी पाँईट बनविले.
आता हे सेल्फी पाँईट आहेत कुठे?शहरातील व्हायफाय सुविधा सध्या कुठल्या स्थिती आहे याची माहिती द्यावी.तसेच शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविले ते नेमके किती दिवस सुरू होते. त्याचबरोबर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील श्री.दत्तमंदीर परिसरात १ रूपयात फिल्टर पाणी अर्थात एटीएम द्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची मशीन बसविण्यात आली.या मशीनचे किती लोकांना पाणी मिळाले? महापुरूष महाराणा प्रताप सिहांचे ६० लाख रुपये खर्चून कलादालन उभारण्यात आले.मात्र या कलादालनाला पहील्याच पावसात गळती लागली.त्या कलादालनाला प्लास्टीक घालुन ठेवण्यात आले. जनतेने गेली पाच वर्ष मोठ्या अपेक्षेने आमदार राणेंकडे सत्ता दिली होती.या पाच वर्षात पाण्याची कोणती योजना राबवुन मुबलक पाणी देण्यासाठी प्रयत्न केलेत हे त्यांनी जाहीर कराव अस आव्हान दिले. शहरातील गटारांची दुरावस्था झाली आहे.गटारांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत.शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये सांडपाण्याची दुर्गंधी सुटलेली असते ते आमदार राणे का थांबवु शकले नाहीत.त्याचबरोबर शहरात मासळी बाजार,भाजीपाला बाजार आजही रस्त्यावरच भरत आहे.त्याकरीता स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही. आमदार नितेश राणे यांनी याची उत्तरे जनतेला दिली पाहीजेत.पाच वर्षात काहीच करू न शकलेल्या आमदार व त्यांच्या उमेदवारांना मत मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे येथील मतदारांनी आता एक संधी शिवसेनेला द्यावी अस आवाहन देखील श्री. लोके यांनी केले.
