कर्नाटकातील त्या घटनेचा सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध…

*⚡सावंतवाडी ता.१९-:* कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून, त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक करून, शुद्धीकरण करण्यात आले आहे.

आज सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हाताने दुधाने अभिषेक करून शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षक अर्चना घारे – परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, प्रफुल्ल सूद्रिक, हिदायतुल्ला खान, संदेश राणे, अर्शद बेग, संदीप राणे, सचिन पाटकर, सिद्धेश तेंडुलकर, आसिफ मुजावर, रिद्धी परब, सावली पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page