गंगा मातेच्या भेटीसाठी किर्लोस देवराठी दाखल

ढोल-ताशांच्या गजरात आगमन; 21 डिसेंबरपर्यंत मुक्काम

*⚡कणकवली ता.१९-:* मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथील डेरवण येथे गंगेचा उगम झाला असून गंगा मातेच्या किर्लोस गावची देवराठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी गंगास्थळी दाखल झाली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाली असून किर्लोस गांगोमंदिर येथून 500 मीटर अंतरावर ही गंगा अवतीर्ण झाली आहे.दर्शनासाठी परिसरातील गावातील भाविकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 35 ते 40 वर्षानंतर किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .गंगास्थळी किर्लोस गावची देवराठी गंगा मातेच्या भेटीसाठी 21 डिसेंबरपर्यंत थांबणार आहे. किर्लोस गावात डेरवणे गंगेचे धरण म्हणून फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे . गंगेचा उगम तब्बल 35 ते 40 वर्षानी होत आहे . गेले 10 ते 12 दिवस गंगेचे पाणी वाहत आहे . . किर्लोस गावातील गंगा मातेच्या भेटीसाठी गावची देवराठी 19 डिसेंबर दाखल झाली असून ते 21 डिसेंबर या कालावधीत गंगा स्थळी थांबणार आहे .भाविकांनी यावेळी उपस्थित राहून गंगा मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किर्लोस ग्रामस्थांच्यावतीने अर्जुन उर्फ बाळा लाड व प्रविण घाडीगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page