Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग एअरपोर्टला निलेश राणेंनी दिली भेट

उदघाटन कार्यक्रमाचा घेतला आढावा *⚡कुडाळ ता.३०-:* माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी नुकतीच चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाला भेट दिली व विमान सेवा शुभारंभ तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व बंड्या सावंत उपस्थित होते .यावेळी विकासक कंपनीचे किरणकुमार प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर श्री ,सकपाळ शिंदे आदी उपस्थित होते…

Read More

वजराट येथील हातमाग कारागिरांचा करणार सत्कार

सिंधू आत्मनिर्भर योजने अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी आयोजन अतुल काळसेकर यांची माहिती *⚡वेंगुर्ले ता.३०-:* वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती दिनी सायंकाळी ३.३० वा. वजराट येथे सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,संघटन…

Read More

कणकवली नगरपंचायत शहरातील असंघटीत कामगारासाठी ई – श्रम कार्ड नोंदणी सुविधा

*⚡कणकवली ता.३०-:* कणकवली नगरपंचायत शहरातील असंघटीत कामगारासाठी ई – श्रम कार्ड नादणी सुविधा उपलब्ध केली आहे . कणकवली नगरपंचायत हद्दीतील असंघटीत कामगारांन 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत ई सेवा केंद्रामध्ये ई – श्रम कार्ड नोंद करुन घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी , कणकवली नगरपंचायत यांनी केले आहे . तरी अधिक माहितीसाठी कणकवली नगरपंचायत कार्यालयातील…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ५३० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जिल्ह्यात इकॉलॉजीकल टास्क फोर्स स्थापन करणार

ब्रिगे सुधीर सावंत:जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याशी केली चर्चा *⚡ओरोस ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल होत असून शेतीकडे पाठ फिरवत आहेत. हत्त्ती, डुक्कर, माकड, गवारेडे, वनगाय, शेकरू इत्यादी प्रकारचे वन्य प्राणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून हे प्राणी सध्या जंगल भाग सोडून गावातील लोकवस्ती…

Read More

कणकवली शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सत्ताधाऱ्यांना जाग केव्हा येणार?

विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल; निवडणूक आल्यावर रस्ते करणार का? *⚡कणकवली ता.३०-:* कणकवली शहरातील प्रमुख दाटीवाटी असलेल्या प्रभाग क्र . १३ व शहरातील अन्य रस्ते खराब झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नगर, गाडदेवी मंदिर नजीक, बिजली नगर, विठ्ठल भवन- भूमी अभिलेख रस्ता, दत्त मंदिर बांदकरवाडी या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांना केव्हा जाग येणार?निवडणूक आल्यावर…

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शनची 3 रोजी कणकवलीत मार्गदर्शनपर कार्यशाळा

*⚡कणकवली ता.३०-:* ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत कणकवली येथे मानवी हक्क, कर्तव्य अधिकार व अंमलबजावणी या विषयाची कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेला खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी,राष्ट्रीय सचिव डॉ.जावेद शिकलगार,राष्ट्रीय…

Read More

दोडामार्ग तहसील कार्यालयात दुर्गंधीचे साम्राज्य

स्वच्छ भारत अभियान दिखाव्यापुरतेच : नागरिकांचे आरोग्य धोक्यात *⚡दोडामार्ग ता.३०-: सुमित दळवी* देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान चालू आहे. मात्र ते दिखाव्यापुरतेच आहे असच म्हणावं लागेल. लोकांचे जीवन आरोग्य सुदृढ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच दोडामार्ग तहसील कार्यालयात मात्र शौचालयात तसेच आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत तीन तेरा वाजले आहेत. तहसीलदार कार्यालयात…

Read More

बांदा स्मशानभूमीतील कचरा चार दिवसांत न उचलल्यास आंदोलन छेडणार

बांदा शहर शिवसेनेच्यावतीने सरपंचांना निवेदन : चार दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे सरपंचांचे आश्वासन *⚡बांदा ता.३०-:* बांदा स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी येणाऱ्या डांबरी रस्त्यावर देखील कचरा टाकण्यात आल्याने स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी येणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या ४ दिवसात स्मशानभूमी परिसर दुर्गंधीमुक्त करावा अन्यथा मंगळवार दिनांक ५…

Read More

१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचा स्नेहमेळावा

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ल येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे…

Read More
You cannot copy content of this page