Headlines

आंबेरी येथे कर्ली खाडीत होडी उलटून एक जण बेपत्ता : दोन महिलांसह तिघे बचावले

⚡मालवण ता.१७-:
मालवण तालुक्यातील आंबेरी येथे कर्ली खाडीतून प्रवास करताना होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबई येथील दर्शन सकारिया हे खाडीपात्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. तर होडी चालकाने प्रसंगावधान राखत होडीतील अन्य दोन महिलांना वाचविण्यात यश मिळवले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबेरी येथे मुंबईहुन आलेले दर्शन सकारिया वं त्यांची पत्नी तसेच होडी चालक वं त्याची बहीण असे चारजण होडीत बसून कर्ली खाडीतून वाकजुवा बेटावरील आपल्या माड बागायतीकडे जात होते. होडी मध्यावर गेली असता अचानक होडी पलटी होऊन होडीतील चौघेही पाण्यात फेकले गेले. यावेळी होडी चालकाने इतरांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता होडीतील दोन्ही महिलांना वाचविण्यात त्यास यश आले. मात्र दुर्दैवाने दर्शन सकारीया हे खाडीच्या पात्रात बेपत्ता झाले. या घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी खाडी किनारी धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त होडी किनाऱ्यावर आणण्यात आली मात्र खाडीत बेपत्ता झालेले दर्शन सकारीया हे अद्याप सापडून आले नसून ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

You cannot copy content of this page