Headlines

*सावंतवाडी नगरपरिषदेचे बंद घड्याळ अखेर सुरू…

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या घड्याळाची दुरुस्ती: सभापती मोहिनी मडगावकर..

⚡सावंतवाडी ता. १७ -: सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि शहराची ओळख असलेले नगरपरिषदेचे ऐतिहासिक घड्याळ आज अखेर दुरुस्त करून सुरू करण्यात आले. पावणे बाराच्या सुमारास हे घड्याळ सुरू करण्यात आले असून ही सावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अशी माहिती सभापती मोहिनी मडगावकर यांनी आज येथे दिली.

याबाबत माहिती देताना मोहिनी मडगावकर म्हणाले की, हे घड्याळ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने संपूर्ण सावंतवाडीकरांचे लक्ष या घड्याळाकडे असते. पर्यटनाच्या दृष्टीने हे एक मोक्याचे ठिकाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे घड्याळ बंद अवस्थेत होते, ते पाहून वाईट वाटत होते. अखेर आज ते दुरुस्त करून सुरू करण्यात आल्याचा आनंद आहे.
सावंतवाडी शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून नमो उद्यानाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम दीड महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. तसेच बोटिंग प्रकल्पासाठी नव्या बोटी आणून लवकरच बोटिंग सेवा सुरू करण्यात येणार असल्याचा देखील त्यांनी सांगितले.

सत्तेत आल्यानंतर सावंतवाडी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि सर्व नगरसेवक मिळून सावंतवाडीचा विकास करून तिचे नाव महाराष्ट्रात पर्यटनात नंबर एकवर नेण्यासाठी आम्ही पुढील पाच वर्षात पूर्ण प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page