Headlines

उपरलकर देवस्थानजवळ ट्रक रेलिंगला धडकला…

चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने अपघात; चालक सुखरूप..

⚡सावंतवाडी, ता. १७-: सावंतवाडी शहरातील उपरकर देवस्थानजवळील वळणावर ट्रकचालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला जाऊन धडकला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी पाहणी केली.

You cannot copy content of this page