ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी सुहासिनींची रांग
*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली शहरातील पटकीदेवी मातेचा जत्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.मंदिराला विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.तर पेठेतील पटकीदेवी मंडळाच्या परिसरात रस्त्यावर सडा रांगोळी काढण्यात आली होती. ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी सुहासिनींची मंदिर परिसरात लांबच लांब रांग लागली होती.
गावराठीच्या या मंदिरात सकाळी विधिवत पूजन करण्यात आले.श्री.देव रवळनाथ मंदिरात मानकरी एकत्र होवून तेथून परडी (काकडा)पेटवून वाजत गाजत पटकीदेवी मंदिरात आणण्यात आला.तद्नंतर वार्षिक मानाची ओटी खोतांच्या मंडळींच्या हस्ते भरण्यात आली.
दुपारनंतर गावातील तसेच इतर सुहासिनीनी ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.सुरु झाला तर सायंकाळी काकड्याचे विसर्जन नदीत करून या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.कोरोना बाबत शासनाने दिलेल्या अटींचे पालन करत या जत्रोत्सव साजरा होत आहे. यावेळी गावराठीचे मानकरी,पेठकरी मंडळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
