*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादीत कणकवली या संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल देसाई तर व्हा . चेअरमनपदी चंद्रशेखर राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . कणकवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या तेरा जागांमध्ये भाजपाला सात , शिवसेना व काँग्रेसला सहा जागा देतानाच चेअरमनपदही अडीज वर्षांसाठी करण्यात आले असल्याचे समजते .
बुधवारी झालेल्या या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत साळगांवकर यांनी काम पाहिले . या संचालकांत सुशील पारकर , मनोहर राणे , सत्यवान परब , जिजी राणे , रुपेश आमडोसकर , रवींद्र गावडे , माधवी राणे , सुरेखा ताटे , शालन पवार , प्रदीप मांजरेकर , मधुकर कदम यांचा समावेश आहे . यावेळी सचिव पुंडलिक परब उपस्थित होते .
