शिवसेनेच्या देवगड -जामसंडे न.पं.च्या विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन
*⚡कणकवली ता.१९-:* देवगड – जामसंडे नगरपंचायतीवर शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. तर 1 राष्ट्रवादीची महिला सदस्य निवडून आली आहे. या नगरसेवकांचे सायंकाळी कणकवली पटवर्धन चौकात आगमन होताच तालुका शिवसेनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व घोषणा बाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
या निवडणुकीत पक्षनिरीक्षकाची भूमिका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी यशस्वी रणनीती वापरत हा विजय मिळवण्यासाठी मेहनत घेतली.यामुळे संदेश पारकर यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… संदेश पारकर अंगार है बाकी सब भंगार है… अशी घोषणाबाजी करत आप्पासाहेब पर्यटन चौक दणाणून सोडला. यावेळी जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक,तालुका प्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,शहर प्रमुख शेखर राणे,राजू राठोड,रुपेश आमडोस्कर,विलास साळसकर,विलास गुडेकर,रिमेश चव्हाण,वैभव मालंडकर,तेजस राणे,आदित्य सापळे,साई कोदे,वैभव महाडिक,अरुण परब ,चंदन पाटील,आदी सनेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
