देवगडात-जामसांडेत भाजपला धक्का

सेना-राष्ट्रवादी आघाडीचा विजय

देवगड ता.१९-: देवगड जामसंडे नगरपंचायत अटीतटीच्या सार्वत्रिक निवडणूकित शिवसेना ८ आणि भाजपचे ८ तर महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे एक उमेदवार विजयी ठरले. देवगड जामसंडे नगरपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.तर आमदार नितेश राणे च्या मतदारसंघात भाजपला धक्का देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा भाजप उमेदवार प्रणाली माने पुन्हा एकदा प्रभाग क्र ९ मधून विजयी झाल्या तसेच तन्वी चांदोस्कर या माजी नगराध्यक्ष यांच्या पत्नी विजयी झाल्या परंतु माजी नगराध्यक्ष भाजपचे योगेश चांदोस्कर ,उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,गटनेत्या शिवसेना उमेदवार हर्षा ठाकूर,याना पराभवाला सामोरे जावे लागले .

तर देवगड जामसंडे मधील जनतेने नवीन युवा चेहऱ्यांना संधी दिली.या निवडणुकीत येथील मतदारांना परिवर्तन हवे होते हेच या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत,संजय पडते ,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे,काँग्रेस अध्यक्ष उल्हास मणचेकर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,युवक जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे समवेत तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुक मतमोजणीला सकाळी १० वाजलेपासून निवडणूक निर्वाचन अधिकारी देवेंद्र तामोरे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे,यांच्या उपस्थितीत देवगड तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सुरुवात झाली. सकाळ पासूनच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही पक्षाचे कायकर्ते पदाधिकारी यांनी सकाळ पासून मतमोजणी ठिकाणी गर्दी केली होती. प्रत्येक फेरीत चार प्रभागाचे निकाल घोषित करण्यात येत होते .प्रत्येकी फेरीत दोन भाजप दोन शिवसेना अशी निकाल येत असल्याने निकालात चुरस वाढली होती.तिसऱ्या फेरीत प्रभाग क्र १० मध्ये महाविकास आघाडी राष्ट्रवादिचे उमेदवार विजयी होऊन राष्ट्रवादीने आपले खाते खोलले त्यानंतर १६ प्रभागाचे निकाल जाहीर होताच भाजप ८ ,शिवसेना ७,राष्ट्रवादी १ या प्रमाणे भाजप ८ महाविकास आघाडी ८असे समसमान बलाबल झाले.त्यामुळे शेवटच्या क्र १७ च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हा मतदार संघ महिला राखीव होता या प्रभागाचा निकाल घोषित होताच तो भाजपकडे गेल्याचे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सांगितले परंतु तो आनंद क्षणभंगुर ठरला .या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या.त्यामुळे बलाबल भाजप ८,शिवसेना ८,राष्ट्रवादी १ या प्रमाणे झाले.या नंतर शिवसेना महाविकास आघाडीने एकच जल्लोष करून मतमोजणी ठिकाण ते शिवसेना कार्यालय या मार्गावर पायी घोषणा देत मिरवणूक काढली. व आनंदोत्सव साजरा केला.

: देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग निहाय निकाल या प्रमाणे आहेत. देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्र १ कावले स्वरा सुरेश २८८ भाजप ( विजयी) शेडगे रिया रवीन्द्र -२३९ शिवसेना प्रभाग क्र २ खान अब्दुल रशीद अली,५ काँग्रेस बाने धीरज गोविंद१२७ भाजप मामघाडी तेजस दत्तात्रय,२९१ शिवसेना (विजयी) प्रभाग क्र ३-कावलेआश्विनी अरविंद ६ काँग्रेस पाटकर कल्पना गुरुनाथ ५३ शिवसेना पाटकर रुचाली दिनेश ४१५ भाजप (विजयी) प्रभाग क्र ४ घाडी मनीषा अनिल,३०१ शिवसेना(विजयी) भडसाळे मृणाली महेश२९६ भाजप प्रभाग क्र ५-कुळकर्णी सुजाता उमेश काँग्रेस १६३ जामसंडेकर मनीषा अनिल १९९ भाजप (विजयी) प्रभाग क्र ६ चांदोस्कर तन्वी योगेश२९० भाजप (विजयी) साची प्रमोद,चांदोस्कर ०७ काँग्रेस देशपांडे निधी निनाद १८८ शिवसेना प्रभाग क्र ७.कणरेकर प्रफुल भिकाजी अपक्ष ०५, कुलकर्णी सौरभ सुर्यकांत ०९ अपक्ष, खेडेकर रोहन विश्वनाथ ३०६ शिवसेना( विजयी) चांदोस्कर योगेश प्रकाश २६५ भाजप मेस्त्री राजेंद्र बाळकृष्ण ०९ अपक्ष प्रभाग क्र ८.संतोष रवींद्र तारी ३६२ शिवसेना (विजयी) नाडणकर प्रणव चंद्रकांत१५ अपक्ष पारकर निधी नयन १४२ भाजप प्रभाग क्र ९ कोयंडे विशाल अर्जुन १४८ शिवसेना माने प्रणाली मिलिंद ३१२ भाजप (विजयी) प्रभाग क्र १० कदम गौतमी रमेश २३९ भाजप ,सावंत मिताली रमेश ३०६ राष्ट्रवादी काँग्रेस (विजयी) प्रभाग क्र ११ कोरगावकर अनिल विनायक २०४ भाजप,तारी निवृत्ती रवींद्र शिवसेना ३४० (विजयी)पारकर मनोज दत्तात्रय काँग्रेस ०८ काँग्रेस प्रभाग क्र १२ खवळे ज्ञानेश्वर सूर्यकांत १२७ भाजप ,पाटील दयानंद शामराव,१८९ अपक्ष बांदेकर नितीन शरद २१० शिवसेना (विजयी),महाडिक शैलेश रमेश १५ काँग्रेस प्रभाग क्र १३ कणेरकर उमेश भास्कर १०६ भाजप,देवगडकर सुरेश धाकु ३ कॉग्रेस,कांबळी किरण बाबाजी १०६ राष्ट्रवादी ,गोळवणकर उमेश धनंजय,१३ अपक्ष,मांजरेकर विशाल विकास मांजरेकर १४३ शिवसेना (विज

You cannot copy content of this page