सिंधुदुर्गनगरी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले आहे. यावेळी नवनिर्वाचित बँक संचालक प्रकाश बोडस, दिलीप रावराणे , समिर सावंत, रविंद्र मडगांवकर,बँकेचे माजी संचालक प्रकाश मोर्ये, गुरूनाथ पेडणेकर, प्रकाश गवस आदि मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चितपणे देशात आपला कामाचा ठसा उमटवेल तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची सांगड घालत बँक शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करेल असा विश्वास पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
