सावंतवाडी ता.२०-: आंबोली येथे झालेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या एकाची न्यायलयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.
आंबोली नागरतास येथे 25 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या अपघातात मिलिंद भोसले दांपत्य जख्मी झाले होते. त्यांनी स्वप्नील यादव या युवकांवर हयगयीने गाडी चालवून ठोकर देऊन जख्मी केल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल केली होती. यावरून सबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, आरोपीच्या वतीने अँड परशुराम चव्हाण यांनी साक्षीदारांची केलेली उलट तपासणी आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायलयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
