बँक संचालक गणपत देसाई यांचा कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने केला सत्कार

देसाई आहेत संस्थेचे सचिव

दोडामार्ग ता.२०सुमित दळवीी:- कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गणपत देसाई हे सिंधुदुर्ग बँकेच्या संचालक पदावर निवडून आल्याबद्दल त्यांचा संस्थाध्यक्ष प्राचार्य एम.डी.देसाई व सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यामार्फत प्रशालेत सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष सखाराम देसाई, सदस्य अनिल कासार,आनंद देसाई, मुख्या.महेंद्र देसाई, शिक्षक आदी उपस्थित होते.यावेळी गणपत देसाई यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांची असलेली जाणीव व लघु-उद्योग धंद्यातील त्यांचा अभ्यास तसेच सहकार क्षेत्रातील त्यांचे आजपर्यंतचे योगदान याचा इथल्या लोकांसाठी नक्कीच वापर करतील. असे गौरोउद्गार संस्थाध्यक्ष एम.डी.देसाई यांनी काढले.यावेळी गणपत देसाई यांनीही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण होतकरु उद्मोजकांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रशालेचे जेष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ यांनी मानले.

You cannot copy content of this page