Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गातील समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा…

युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोस्कार यांची खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी… सावंतवाडी-: समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होताना दिसत आहे. अश्या दुर्घटना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर सारख्या मोठ्या वर्दळीच्या समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी खासदार श्री विनायक राऊत यांचे…

Read More

भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेत २९ रोजी महाकर्ज मेळावा

*⚡कणकवली ता.२८-:* भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेच्या आवारात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे मार्गदर्शन स्टॉल असणार आहेत . तसेच यावेळी एसबीआय लाईफ , जनरल इन्शुरन्स , म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीवर मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार…

Read More

एस. टी .कर्मचारी संघटनांचे बेमुदत उपोषण सुरूच

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठवण्याचा निर्धार *⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून आजच्या दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. यावेळी एच.बी. रावराणे, विभागीय सचिव इंटक पांडुरंग गावडे, इंटक कणकवली आगार अध्यक्ष गौरेश लोकरे, कामगार संघटना विभागीय सचिव विनय राणे, कामगार संघटना विभागीय…

Read More

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित…

वैभववाडी प्रतिनिधी करुळ घाटमार्ग ते तळेरे पर्यंतचे खड्डे 15 नोव्हेंबर पर्यंत भरुन रस्त्याची डागडुजी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता श्री कुमावत यांनी दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारचे करूळघाटतील उपोषण स्थगित केले आहे. तहसीलदार श्री रामदास झळके,पोलिस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार श्री.नाईक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता श्री कुमावत यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा…

Read More

शिधापत्रिका धारकांना आधार नोंदणी व लाभार्थी पडताळणी करून घेण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.२७-:* दरमहाचे धान्याचे वितरण ई-पॉस मशिनदवारे पारदर्शकरित्या होण्यासाठी शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांचे आधार संगणकीकरण जलदगतीने होणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचा लाभ मिळण्याकरीता शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांची आधार नोंदणी (ईकेवायसी) व लाभार्थी पडताळणी (मेंबर व्हेरीफीकेशन) होणे आवश्यक आहे. त्याकरीता शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत दि. १५ नोव्हेंबर पर्यंत मालवण तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी…

Read More

केंद्रीय मंत्रिपदाचा वापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी केला

खास. विनायक राऊत यांची नाम.नारायण राणे यांच्यावर टीका *⚡वैभववाडी ता.२७-:* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज ची मान्यता रद्द करण्यासाठी केलेली धडपड सर्व जिल्हा वासीयांना…

Read More

फोंडाघाट येथील युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला हाती

खासदार विनायक राऊत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत *⚡कणकवली ता.२७-:* शिवसेनेच्या फोंडाघाट येथे झालेल्या फोंडाघाट जिल्हा परिषदेच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन फोंडाघाट येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य आपल्या हाती घेऊन फोंडाघाट भगवामय करून टाकले. प्रवेशकर्त्या युवकांमध्ये प्रामुख्याने करण कदम, चिन्मय सावंत, ओंकार पवार, निनाद पारकर ,सहील बीडये,…

Read More

“पंचायत समिती आपल्या दारी” चा २९ ऑक्टोबरला मठबुद्रुक येथे समारोप

सभापती अजिंक्य पाताडे यांची माहिती *⚡मालवण ता.२७-:* मालवण पंचायत समितीच्या वतीने गेले पंधरा दिवस राबवण्यात आलेल्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा समारोप शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी मठबुद्रुक मध्ये होणार आहे, अशी माहीती सभापती अजिंक्य पाताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सभापती दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य…

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ देणार वृद्धाश्रमासाठी फराळ व कपडे

*⚡मालवण ता.२७-:* ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉम सलग्न), मालवण तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त अणाव येथील वृद्धाश्रमास दिवाळी फराळ व कपडे पाठविण्यात येतात. यावर्षीही दिवाळी फराळ, साबण, उटणे व नवीन कपडे आश्रमासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे संघाच्या सर्व सदस्यांनी फराळ व कपडे २ नोव्हेंबरपर्यंत भाऊ हडकर यांच्याकडे अवश्य आणून द्यावेत, असे आवाहन मालवण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे…

Read More

आचरा समुद्र किनारी भव्य गार्डन उभारण्याची मागणी;

पालकमंत्री उदय सामंत यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष *⚡मालवण ता.२७-:* मालवण मधील रॉकगार्डन च्या धर्तीवर आचरे समुद्रकीनारी भव्य गार्डन, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी उद्यानाची उभारणी करावी अशी मागणी आचरे येथील शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना आचरे शिवसेना पदाधिकारी समीर हडकर, प्रकाश वराडकर, जयंत पांगे,…

Read More
You cannot copy content of this page