⚡मालवण ता.१६-:
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांनी सहपत्नीक आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला भेट देत श्रीदेव रामेश्वर तसेच मंदिरात विराजमान असलेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आचरा येथील वैशिष्ट्यपूर्ण ४१ दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा व धार्मिक विधींची माहिती जाणून घेतली.
श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर न्यायाधीश जामसंडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसह निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली. समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य कायम राहावे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, अशी मनोकामना त्यांनी गणरायाच्या चरणी व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी रामेश्वर संस्थानच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी यांच्या हस्ते न्यायाधीश अमित जामसंडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आचरा गावचे सॉलिसिटर तथा देवस्थान ट्रस्टी शिल्पन गावंकर, खजिनदार कपिल गुरव, ग्रामस्थ तसेच देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
न्यायाधीश अमित जामसंडेकर यांचे आचरा रामेश्वर मंदिरात दर्शन…
