मालवण (प्रतिनिधी)
राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संगठनच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सुखाजी बापर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेने दि.२४ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे नूतनीकरण केले असून, त्यांचा कार्यकाळ २४ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२८ असा राहणार आहे.
संस्थेच्या दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार श्री. सुरेश बापर्डेकर यांच्या कार्याचा अनुभव, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेला संवाद तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. व्यंकटेश महादेव अटक यांच्या शिफारशी आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, जनकल्याणकारी उपक्रम आणि संस्थेने मंजूर केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिस्त, आचारसंहिता आणि कार्यपद्धतीचे पालन करून संघभावनेने काम करण्याचे आवाहन नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून वंचित, दुर्लक्षित तसेच ज्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचत नाही अशा घटकांसाठी काम करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनकल्याणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत, असे सुरेश बापर्डेकरं यांनी सांगितले. सुरेश बापर्डेकर यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, मंडळे, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
