वैभववाडी शिवसेने कडून मनोज सावंत यांचे अभिनंदन
वैभववाडी प्रतिनिधी: वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समित्या आज गठीत करण्यात आल्या. त्याचसोबत स्वीकृत नगरसेवक देखील निवड झाली. शिवसेनेकडून व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष मनोज सावंत यांची बिनवरोध निवड करण्यात आली. सावंत यांच्या निवडीबद्दल वैभववाडी शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे शिवसेना शहर प्रमुख प्रदीप रावराणे, संभाजी रावराणे, नूतन नगरसेवक रणजित तावडे, नगरसेविका दर्शना पवार, श्रद्धा रावराणे, सानिका रावराणे, माजी नगसेवक संतोष पवार, माजी सभापती रमेश तावडे, अंबाजी हुंबे, शिवाजी राणे, सुनील रावराणे अधी शिवसैनिक उपस्थित होते. वैभववाडी शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
