सिंधुदुर्गनगरी ता १८ प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली सह विविध प्रश्नाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीचे आंदोलन लांबले आहे. आजच्या पाचव्या दिवशीही जिल्हा परिषदेसमोर त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन आणि प्रशासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर आजच्या पाचव्या दिवशी आंदोलन सुरु ठेवले आहे
या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक भारती संघटनेने आंतरजिल्हा बदलीच्या ५व्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे .या प्रमुख मागण्यांकड़े प्रामुख्याने प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी १४ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यावर जो पर्यन्त योग्य निर्णय होत नाही तो पर्यन्त अन्दोलनवर ठाम रहाण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत. प्रत्तेक भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे .
शिक्षकांचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात असल्याची संघटनेची धारणा झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बदली ला मंजुरी दिलेली असतानाही प्रशासनाकडून बदलीपात्र शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही यामुळे बदलीपात्र शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाच दिवस झाले तरीही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही त्यातही प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधी कडून आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे याबाबत उपोषण कर्त्या शिक्षकांनी खंत व्यक्त केली आहे. याआंदोलनात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांबरोबरच स्यानिक शिक्षक मोठ्या संखेने उपस्तित झाले आहेत.
