वैभववाडी : भाजपा स्वीकृत नगरसेवकपदी डॉ. राजेंद्र पाताडे यांची निवड

वैभववाडी ता.१८-:* वाभवे – वैभववाडी नगरपंचायच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाकडून डॉ. राजेंद्र पाताडे यांची निवड जाहीर झाली आहे. येथील नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने, मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर झाली आहे.

निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. या नगरपंचायतमध्ये भाजपाचे 10 नगरसेवक, शिवसेना 5 व अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. या नगरपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. नगरपंचायतीत एकूण दोन पदे स्वीकृत नगरसेवकसाठी मंजूर होती. त्यापैकी एक स्वीकृत नगरसेवक भाजपाच्या वाट्याला आले. तर दुसरे शिवसेनेच्या कोट्यातून आहे. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी मनोज सावंत यांची निवड झाली आहे. डॉ. राजेंद्र पाताडे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येथील भाजपा कार्यालयात डॉ. पाताडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, हुसेन लांजेकर, नगरसेवक रोहन रावराणे, विवेक रावराणे, नगरसेविका सुंदरी निकम, संगीता चव्हाण, रेवा बावदाने, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, राजन तांबे, अंकित सावंत, संतोष महाडिक, विनायक रावराणे अनंत फोंडके आदी उपस्थित होते. डॉ राजेंद्र पाताडे हे गेली 26 वर्षे वैभववाडी तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. कोरोना महामारीत त्यांनी सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा बजावत रुग्णांवर उपचार केले. येथील दुर्गामाता उत्सव मंडळात डॉ. पाताडे अनेक वर्ष अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा खाजगी वैद्यकीय संघटना (डीएफसी) च्या जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. स्वीकृत नगरसेवक पदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. फोटो – स्वीकृत नगरसेवकपदी डॉ. राजेंद्र पाताडे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना वैभववाडी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक.छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page