मालवण मराठा शिक्षक संघटन आयोजित स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण ता.१८-:* मालवण मराठा शिक्षक संघटन तर्फे निबंधलेखन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

निकाल पुढीलप्रमाणे:- निबंधलेखन स्पर्धा :- खुला गट (विषय- शिवरायांची प्रेरणा आणि वर्तमानाची घडण) प्रथम- दिक्षा सुमंत तोंडावळकर (मालवण), द्वितीय- महेक इब्राहिम शेख (मालवण), तृतीय- संपदा शिवराम गावडे (चौके), उत्तेजनार्थ.१- राधिका राजन शेलटकर (मालवण), उत्तेजनार्थ २-पौर्णिमा प्रकाश गावडे(मालवण). शालेय गट- (विषय- सद्यस्थितीतील गडकिल्ले व शिवराय यांच्यातील संवाद) प्रथम- रिया गणेश गिरकर.(मसुरे), द्वितीय- तनिष्क आशिष पेडणेकर (आचरा), तृतीय- सिम्रन नितीन गांवकर (आचरा), उत्तेजनार्थ १) स्नेहलता सत्यविजय तेली (मालवण) उत्तेजनार्थ २) गायत्री संतोष गांवकर (मालवण). चित्रकला- रंगभरण स्पर्धा:- शालेय गट- पहिला चित्रगट -(विषय- बालशिवाजी व जिजामाता) प्रथम- तनिष के.खोत, (रोझरी इंग्लिश स्कुल), द्वितीय- स्वरा रुपेश बांदेकर (भंडारी प्राथमिक शाळा), तृतीय- ओम प्रसन्नकुमार वाघरे (मालवण धुरीवाडा शाळा), उत्तेजनार्थ १) गौरी पंढरीनाथ मसुरकर (मसुरे कावा शाळा), उत्तेजनार्थ २)आराध्य अशोक थोरात. दुसरा चित्रगट (विषय- शिवाजी महाराज युद्धकला) प्रथम- अस्मी पंकज धुरी (मालवण दांडी शाळा), द्वितीय- वेदिका परशुराम लुडबे (अंबाजी विद्यालय मालवण), तृतीय- प्रांजली संजय कुंभार (कांदळगांव नं.१ शाळा) उत्तेजनार्थ १-वेदिका विरेश पेडणेकर (मसुरे कावा शाळा), उत्तेजनार्थ २-आनंदी विनोद सातार्डेकर. तिसरा चित्रगट- (विषय- शिवजन्मोत्सव) प्रथम- समर्थ दिनेश सावंत (भंडारी प्राथमिक शाळा), द्वितीय- रुद्र रोशन तोडणकर (रोझरी इंग्लिश स्कुल), तृतीय- हरिश महेश परब (शाळा आचरे नं.१), उत्तेजनार्थ १- दिक्षांत दीपक शिवापूरकर (जयगणेश इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ२-तनुजा धोंडु लाड (सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा), चौथा गट- (विषय- बालशिवाजी खलबते) प्रथम- दुर्वा प्रसाद परब (शाळा- मसुरे-देऊळवाडा), द्वितीय- तन्मय रामचंद्र मेस्त्री (शाळा- मसुरे-देऊळवाडा), तृतीय- वेदांगी संदेश चेंदवणकर, (शाळा-चिंदर बाजार), उत्तेजनार्थ १-ऐश्वर्य सुजित तोंडवळकर (कन्याशाळा-मालवण), उत्तेजनार्थ २-चैतन्य पराग पांचाळ (मसुरे-देऊळवाडा). या निबंध लेखन स्पर्धेचे परिक्षण सौ.सुमेधा जोशी व श्री.शिवराज सावंत यांनी केले. चित्रकला/रंगभरण स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक बलराम सामंत यांनी केले. विजेत्या स्पर्धकांनी बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण मराठा शिक्षक संघटन तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page