मालवण ता.१८-:* देवबाग समुद्र किनारी मासेमारी जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवास शुक्रवारी सकाळी स्थानिक मच्छीमारांनी जीवदान देत समुद्रात सोडले.
देवबाग किनारी एका मासेमारी जाळ्यात मान पूर्णपणे अडकलेल्या स्थितीत जाळ्यात अडकलेले समुद्री कासव मच्छीमारांना दिसून आले. दरम्यान, बाबू कासावकर, रणजित कुर्ले, महेंद्र कासवकर, संतोष साळगावकर, उत्तम केळुसकर व अन्य ग्रामस्थांनी कासवाची जाळ्यात सुटका करत, कासवाला समुद्रात सोडत जीवदान दिले. अंडी घालण्याच्या उद्देशाने समुद्री कासवे किनाऱ्याच्या जवळ येतात. स्थानीक नागरिक, मच्छीमार यांच्या वतीने कासवांची अंडी दिसल्यास त्यांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असतात. काही दिवसांपूर्वी जाळ्यात अडकलेल्या कासवाला मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा समुद्री कासवास मच्छीमारांनी जीवदान दिले आहे.
