निलेश राणेंच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर होणार शिवजयंती साजरी

मालवण : (प्रतिनिधी) शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे दि. १९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहून शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत.

गेली काही वर्षे माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती साजरी करतात. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा शिवजयंती सोहळाही निलेश राणेंच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात भाजपाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page