बापार्डे ग्रामपंचायत स्वच्छतेत जिल्ह्यात प्रथम

द्वितीय परुळे बाजार, तृतीय विर्डी ग्रामपंचायत;उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जाहीर केला निकाल

*⚡ओरोस ता.१८-:* संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये देवगड तालुक्यातील बापार्डे या ग्राम पंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्राम पंचायतीने तर तृतीय क्रमांक दोडामार्ग तालुक्यातील विर्डी ग्राम पंचायतीने मिळविला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हा निकाल जाहिर केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आदी उपस्थित होते. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याने बापार्डे ग्राम पंचायतला पाच लाखांचे, परुळे बाजार ग्राम पंचायतीला तीन लाख रुपये तर विर्डी ग्राम पंचायतीला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. याशिवाय कणकवली तालुक्यातील बीडवाडी ग्राम पंचायतीला सांडपाणी व्यवस्थापनसाठी स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, कुडाळ तालुक्यातील आदुलें ग्राम पंचायतीला शौचालय व्यवस्थापनसाठी स्व आबासाहेब खेडेकर पुरस्कार, तर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्राम पंचायतीला जाहीर झाला आहे. यासाठी तिन्ही ग्राम पंचायतींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page