Global Maharashtra Breaking News

डेगवे-तांबोळी मार्गावरील फॉरेस्ट रस्ता झाला खड्डेमय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास…

⚡बांदा ता.०१-: डेगवे–तांबोळी मार्गावर वन खात्याच्या मालकीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अवघ्या 280 मीटर अंतराच्या या फॉरेस्ट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तांबोळी, असनीये, घारपी, फूकेरी, झोळंबे, भालावल, कोनशी, नांगरतास, दाभील या गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सर्वात…

Read More

बांद्यात १५ नोव्हेंबरला नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धा…

⚡बांदा ता.०१-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक १५ नाव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा च्या नाडकर्णी सभागृहात…

Read More

गावराई गडकरी वाडीतील उभाठा कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत…

सिंधुदुर्गनगरी ता १कुडाळ तालुक्यातील गावराई गडकरवाड़ी येथील उध्दव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यानी शुक्रवारी शिंदे सेनेत प्रवेश करत ठाकरे सेनेला धक्का दिला. कुडाळ तालुक्यातील गावराई गड़करवाडी येथील कार्यकर्ते गेली अनेक वर्षे ठाकरे सेनेसोबत होते . मात्र ठाकरे सेनेचे गेली १०वर्षे आमदार, खासदार असूनही त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मागणीकड़े दुर्लक्ष केले , येथील पाणी सुविधा, रस्ते , गणेश घाट…

Read More

कोलगाव येथे चालकाची दुचाकीला धडक,महिलेला गंभीर दुखापत…

सावंतवाडी : कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. येथून प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ वकील ॲड.‌ बापु गव्हाणकर यांनी जखमींना मदत केली. आपल्या कारन त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत चालकाकडून हा प्रकार घडला. संतप्त स्थानिकांनी…

Read More

दुबार-बोगस मतदारांनवर कणकवलीचा नगराध्यक्ष ठरतो की काय…?

कणकवली शहरात 1000 पेक्षा जास्त दुबार मतदार-सुशांत नाईक यांचा आरोप:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांचे वेधले लक्ष.. ⚡कणकवली ता.०१-: काही दिवसापूर्वी कणकवली शहरात व ग्रामीण भागात 200 दुबार मतदार असल्याबाबतची तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्याजवळ दिली होती. कणकवली शहरात 200 दुबार मतदार असल्या बाबतची यादी आम्ही काढली पण…

Read More

साळगाव येथील भजन स्पर्धेत झारापचे श्री भावई प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

कुडाळ : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साळगाव येथे हरिनाम सप्ताह निमित्त झालेल्या साळगाव पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत श्री भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप. (बुवा साहिल बोभाटे) यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.या भजन स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण अलीकडेच झाले. प्रथम क्रमांक – श्री भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप (बुवा साहिल बोभाटे), द्वितीय क्रमांक-श्री जगन्नाथ प्रासादिक…

Read More

मळगाव येथे ट्रक–दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी,ता.०१-: येथील हायवेवरील चॉकलेट फॅक्टरीजवळ आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकी स्वाराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ सावंतवाडी येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मळगाव आणि वेत्ये परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, अपघाताचे…

Read More

वादळी पावसाने कोकण उद्ध्वस्त; सरकारने कोकणातील शेतकरी-मच्छिमारांना न्याय द्यावा…

माजी खासदार विनायक राऊत:पालकमंत्री जुगार अड्ड्यांवर नौटंकी करतात… मालवण दि प्रतिनिधी वादळी व अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळी सुट्टीत येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे, मासेमारी बंद झाली आहे. पावसाने कोकणातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे सरकार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करते, मात्र…

Read More

सालाईवाडा येथील ललित परब या युवकाचे उपचारा दरम्यान निधन…

⚡सावंतवाडी ता.३१-: सालाईवाडा येथील रहिवासी ललित परब वय वर्ष 30 या युवकाचे आज सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले आहे आज सकाळी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये रवी जाधव व निखिल जाधव यांच्या सहकार्याने अधिक उपचारासाठी दाखल केले होते त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.उद्या त्यांना सकाळी दहा वाजता सावंतवाडी स्मशानभूमी मध्ये…

Read More

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने अभिवादन…

⚡वेंगुर्ले ता.३१-: राष्ट्रीय ऐक्याचे महामेरू, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन करण्यात आले. ” एक भारत , अखंड भारताचे ” शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात मच्छिमार सेल चे जिल्हा संयोजक वसंत तांडेल व जि.का.का.सदस्य…

Read More
You cannot copy content of this page