गोवा बनावटीची दारू बाळगल्याबाबत गुन्हा…

⚡कणकवली ता.२३-:
गैर कायदा, बिगर परवाना गोवा बनावटीची दारू ताब्यात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी अनिल सखाराम रोडये (४७, रा. ओसरगाव – परबवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद चव्हाण व कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी महामार्गानजीक ओसरगाव तलाव येथील एका झाडाच्या आडोशाला गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास केली. यामध्ये ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवादार विनोद चव्हाण करीत आहेत.

You cannot copy content of this page