⚡कणकवली ता.२३-:
दिवा ते सावंतवाडी जाणारी ईर्टीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गानजीक कलंडली. मुंबई – गोवा महामार्गावरील बेळणे खुर्द येथे गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सुहास सहदेव माधव व त्यांची पत्नी स्वरा सुहास माधव (दोन्ही मूळ सरमळे, नांगरतास – सावंतवाडी व सध्या रा. दिवा – मुंबई) हे दोघे जखमी झाले. सुदैवाने कारमधील अन्य दोन प्रवाशांना दुखापत झालेली नाही. मात्र अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सुहास माधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. रानटी जनावर महामार्गावर आल्याने ब्रेक लावला असता कारचा अपघात झाला, असे खबरीत म्हटले आहे. त्यानुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कार अपघातात पती-पत्नी जखमी…!
