वेंगुर्ला
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छिमार बांधवासाठी विविध प्रकारच्या लाभदायी योजना राबविल्या जातात. त्यासाठी विभागामार्फत वेळोवेळी सुचना दिल्या जातात. विभागामार्फत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अधिकारी वर्ग व सागरमित्र हे आपल्या आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करीत असतात.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्ला येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना व इतर शासकीय योजना बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. सद्यस्थितीत विभागामार्फत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेची जनजागृती करण्यास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, नितेश राणे यांच्यामार्फत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची जनजागृती, योजनेचे मार्गदर्शक पुस्तक अनावरण, नौका मालकांना TED उपकरणाचे महत्त्व अधोरेखित करून TED उपकरणाचे वाटप करण्यात आले. तसेच विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती, GAIS, NFDP नोंदणी, KCC योजना याबाबत उपस्थित मच्छीमारांना माहिती देण्यात आली.मत्स्यव्यवसाय विभागामार्फत उपस्थित मच्छिमारांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय विविध योजनांची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी भक्ती पेजे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी उत्कर्षा कीर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा वेंगुर्ला परवाना अधिकारी
गणेश टेमकर आदिनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग चे
सागर कुवेसकर यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ मच्छीमार बांधवांनी घ्यावा, यासाठी जनजागृती करावी असे उपस्थित मच्छीमार बांधव, मत्स्यकास्तकार, मच्छीमार सहकारी संस्था पदाधिकारी यांना आवाहन केले.या कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमार नेते वसंत तांडेल, मच्छिमार नेते दादा केळूसकर, मच्छीमार सहकारी संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदर संस्थांचे प्रतिनिधी व तालुक्यातील 70 मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :
