वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात चालू वर्षाच्या मासेमारी हंगामाला
रविवारी दि.16 ऑगस्ट रोजी
सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लागू करण्यात आलेली 76 दिवसांच्या मासेमारी बंदी कालावधीची पूर्तता झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वेंगुर्ला परवाना अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
गणेश टेमकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमार बांधवांना चालू झालेल्या मासेमारी हंगामाच्या अनुषंगाने उपस्थित मच्छीमार नौका मालक, तांडेल, मच्छी व्यापारी यांना श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच मासेमारीसाठी नेमून दिलेल्या सूचना वेळोवेळी काटेकोरपणे पाळाव्यात, अशा सूचना परवाना अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडून देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लागू करण्यात आलेली 76 दिवसांच्या मासेमारी बंदी कालावधीची पूर्तता झाली आहे. दरम्यान मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील उत्पादन वाढीसाठी 15 दिवसाची वाढीव मासेमारी बंदी ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी घेतला होता. या निर्णयाचे स्थानिक मच्छीमारांनी स्वागत करून पालन केले. या निर्णयामुळे समुद्रातील मत्स्यसाठ्याला वाढीसाठी अधिक वेळ मिळाल्याने आगामी काळात चांगले मत्स्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा उपस्थित मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात आली. नवीन मासेमारी हंगामाच्या अनुषंगाने वेंगुर्ला बंदरात मच्छीमार बांधव, मासेमारी नौकांवरील तांडेल, खलाशी, नौकामालक, मच्छीमार व्यापारी आणि मत्स्य खवय्ये यांची भरपूर लगबग निदर्शनास आली.
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत बंदरात उपस्थित मच्छीमारांना शुभेच्छा दिल्यानंतर, मच्छीमार बांधवांसोबत मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रतिज्ञेचे पठन करण्यात आले. त्यात उपस्थित सर्व मच्छीमारांनी शासनाच्या नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून जैवविविधतेचे रक्षण करून आम्ही मासेमारी करू, अशी ग्वाही विभागास देण्यात आली. सदर कार्यालयात वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सागर म्हाकले, उपाध्यक्ष आनंद वेंगुर्लेकर, संस्था सभासद आणि सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
फोटो :
