Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांचा सन्मान…

⚡वैभववाडी ता.१७-: तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते श्री. संसारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महेश संसारे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केला आहे. कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतीच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे मांगवली गावासह वैभववाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शासनस्तरावर त्यांच्या कार्याची झालेली दखल परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या महेश संसारे यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
महेश संसारे यांच्या या यशाबद्दल मांगवली ग्रामस्थ, शेतकरी बांधव तसेच वैभववाडी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page