महाराष्ट्रात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक; १,०५० अटेंडन्सची नोंद..
⚡आंबोली, ता. १७-: केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमात भारतीय जनता पक्षाच्या आंबोली मंडलाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १,०५० अटेंडन्सची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे आंबोली मंडलाने महाराष्ट्र राज्यात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
देशभक्तीची भावना जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला आंबोली मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडलातील पदाधिकारी, सरचिटणीस, मंडल संयोजक, युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
आंबोली मंडलाने मिळविलेले हे यश सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे मंडलाध्यक्ष संतोष राऊळ यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी आंबोली मंडलातील सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि राष्ट्रभक्त भाजपा कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी आंबोली मंडलाने केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
