⚡सावंतवाडी ता.२३-:
मळेवाड येथे अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली.गेले आठवडाभर वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट उसळली होती.आज गडगडाटासह पावसाने सुरुवात केली.
आज सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.मात्र रस्त्यावर पाणी साचून रस्ते चिखमय बनले होते.तर काही ठिकाणी गुरांसाठी ठेवण्यात आलेले गवत, जळावू लाकडे,या पावसामुळे भिजल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. तर काही ठिकाणी पादचारी,प्रवासी या पावसाच्या बचावासाठी सुरक्षिततेसाठी आश्रय घेताना दिसत होते.
मळेवाड मध्ये अवकाळी पाऊस..
