वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे अपघातात देवगड येथील युवकाचा जागीच मृत्यू…

⚡वेंगुर्ला ता.२२-:
वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.शुभम संतोष गुरव (वय 24,रा. देवगड ) असे त्याचे नाव आहे.तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांवर गुरुवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे दुचाकी व चारचाकीमध्ये अपघात झाला असून दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुचाकी स्लिप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अंब्युलन्स च्या साहाय्याने अधिक उपचारासाठी वेंगुर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरु आहे.यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.मठ भाजपा पदाधिकारी अजित नाईक, ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, संतोष नांदोस्कर, रोहित बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, संतोष तळवडेकर आदी स्थानिक ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलविले.

You cannot copy content of this page