स्वानंदी विश्वनाथ परब राज्यात प्रथम तर मनस्वी झुंजार पेडणेकर राज्यात दुसरी..
⚡मालवण ता.२३-:
महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ मुंबई आयोजित राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षा 2025 -26 मध्ये भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे,मर्डे या प्रशाले मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये प्रशालेचा विद्यार्थी कुमार स्वानंद विश्वनाथ परब ग्रुप ब,इयत्ता तिसरी व चौथी या गटातून १०० पैकी 97 मार्क मिळवत राज्यात प्रथम आला आहे,तसेच याच प्रशालेची विद्यार्थिनी मनस्वी झुंजार पेडणेकर इयत्ता चौथी ग्रुप B हीसुद्धा 96मार्क्स मिळवत राज्यात दुसरी आली आहे या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. सलग दोन वर्ष या परीक्षेमध्ये प्रशालेचे विध्यार्थी गुणवंत यादीत येत आहेत.प्रशालेचे एकूण 72 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण निकाल हा 93% लागला सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब, उपाध्यक्ष संजय परब, स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभू गावकर, डॉ अनिरुद्ध मेहंदळे, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले संस्था सचिव अशोक मसुरेकर मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, मसुरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून सिस्टर कांता, सिद्धी मेस्त्री,रसिका मेस्त्री,स्वरांजली ठाकूर, स्टेला लोबो यांनी मार्गदर्शन केले.
